धार्मिक सांस्कृतिक

ग्रामदैवत नरसिंह कार्तीकी उत्सव–

  • कार्तिक, महिण्यातील नरसिंह देवस्थानाचा कार्तिक समाप्ती असते त्यावेळी गावातील सर्व मंडळी एकत्र होवून त्या कार्तिकेला लोक वर्गणी निवेदनात कार्तिकेचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडतात.
  • नोव्हेंबर महिन्यातील श्री मायाक्का देवीची यात्रा मोठया भक्तीभावाने साजरी केली जाते. त्यावेळी गावात ऑक्रेस्ट्रा आणला जातो. त्यावेळी गावातील सर्व युवक मंडळाने एकत्र होवून त्या ऑक्रेस्ट्राची नियोजन करतात. पहिल्या दिवशी भाजी भाकरीचे नैवद असतो त्यावेळी गावातील सर्व महिला आपल्या घरातील ताजी भाजी भाकरी घेवून नैवद दाखवतात. दुसया दिवशी त्या मंदिरासमोर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला जातो. त्यावेळी मौजे खटाव गावाभवतालची सर्व खेडयाती लोक मोठया संख्येने हजर राहतात व महाप्रसादाचा लाभ घेतात व कोणताही दंगा, भांडण न करतात. श्री. मायाक्का देवीची मिरवणूक काढली जाते त्यावेळी वाजंत्री व ढोल आणले जातात मोठया जनसमुदायात ही पालखी मंदिरापासून आप्पासो आण्णा पाटील यांच्या व रावसो आण्णा पाटील यांच्या घरांपर्यत वाजत गाजत व यल्लमाच्या नावाने चांगभलच्या गजरात वाजत गाजत निघते.

बसवेश्वर महाराजाची–

  • जयंती मोठया जनसमुदयात काढली जाते. सायंकाळी 4 वाजता ही मिरवणूक निघते गावातील तरुण मंडळे एकत्र येवून या मिरवणूकीस हजर राहून त्या कार्यक्रमात उत्साहाने नाचून गुलाल उधळून मोठया आनंदाने साजरा करतात.

सदानंद महाराज–

  • यांची मठामध्ये सोगी भजन म्हटले जाते. त्यावेळी अनेक गावापासून भजनी मंडळे येतात त्याच्यामध्ये मोठया प्रमाणात चुरस लावली जाते. त्यावेळी तो क्षण पहाणेसारखा असतो गावातील सर्व वयस्कर व महिला मोठया संख्येने हजर असतात.