जलस्त्रोत

  1. गावाच्या दक्षिणेकडे कृष्णा नदी वाहते या नदीवर सहकारी शेती नळपाणी पुरवठा योजना केलेला आहे व लिफट ऐरिगेशन द्वारे शेतीला पाणी पुरविला जातो व सहकारी तत्वावरील लिफट एरिगेशन संस्था उत्तम पध्दतीने सुरु आहेत धरण बांधणेत आल्यामुळे गावाच्या आजुबाजूच्या खेडयांना व वस्त्यांना त्याचा मोठया प्रमाणात कायदा होतो त्यामुळे शेतीसाठी 12 महिने जलसिंचनासाठी सोय उपलब्ध असल्यामुळे हे गाव हिरवेगार व धनसंपत्तीने सुखी व समृध्द आहे.
  2. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी नांद्रे वसगडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करणेत आली आहे पलूस व मिरज तालुक्यांनी गावाच्या यामध्ये समाविष्ट करणेत आला आहे त्यामुळे सुमारे 1 लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे.