आरोग्य सुविधा

  • गावात यापुर्वी आरोग्य सुविधा नसलेमुळे सर्व लोकांना भिलवडी, वसगडे या गावी जावे लागत असे, आता गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधणेत आले आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातुन गावातील सर्व लोकांचे तपासणी केली जाते, व हिवताप, माताबाल संगोपन, क्षयरोग नियंत्रण, कृष्ठरोग निमुर्लन, अंधत्व निवारण तसेच कुटुंब नियोजन यासारखे कार्यक्रम राबविले जातात.
  • प्रथमोपचाराबरोबर महिलांची प्रस्तुती केली जाते. शालेय विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी अगदी 0 ते 6 वयोगटातील मुलांचे आरोग्य तपासणी किशोर वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार आणि सल्ला दिला जातो.
  • जन्म मृत्यू बाल मृत्यू या नोंदीचे सर्व ग्रामपंचायतेला अगदी प्रत्येक महिन्याच्या अखेरला दिले जाते.
  • गावात एकूण खाजगी तीन दवाखाने आहेत. त्यात विविध प्रकारच्या आजारावर उपचार केला जातो.