धार्मिक स्थळ

  • खैरुलाला साबचांचा मंदिर–आहे. हिंदु–मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असून गावचे धार्मिक वैशिष्ट आहे. 31 डिसेंबर रोजी खैरुलाल साहब याचा उरुस असतो त्या दिवशी हिंदु–मुस्लिम लोक त्या मंदिरात जातात परंतु हा दर्गा आहे. परंतु हिंदु लोक याला मंदिराचे पवित्र म्हणतात यावरुन हिंदु–मुस्लिम बांधवात आपलेपणा दिसून येतो. त्यामुळे गावात हिंदु–मस्लिम बांधवात आपलेपणा दिसुन येतो. त्यामुळे गावात हिंदु–मुस्लिमामध्ये जातीय तणाव दंगली होत नाहीत.
  • खैरुलाल बाबा मंदिराची सेवा हिंदु लोक मोठया भक्तीभावाने करतात मुस्लीम बांधवाचे मंदिर हिंदु लोक बांधतात आणि त्याची सेवा भक्ती भावाने करतात असे विषय दुसरीकडे क्वचीतच आढळून येते त्यामुळेच गावात सलोख्या व शांततामय वातावरण आहे. गावात श्री. हनुमान मंदिर आणि मुस्लिम बांधवाची मशिद शेजारी आहे. मात्र कधीही जातीपातीच्या कारणावरुन दंगल झाली नाही.

मंदिरे

  1. विठ्ठल–रुक्मिणी मंदिर.
  2. वसवेश्वर नदी मंदीर.
  3. महादेव मंदिर.
  4. मल्हारी मंदिर.
  5. मायाक्का मंदिर.
  6. मरगुबाई मंदिर गावापासून 1 कि. मी. अंतरावर.
  7. गावापासून पश्चिमेला गणपती मंदिर व सदानंद महाराज यांचे मठ जागरुक आहे.

ही सर्व मंदिरे अत्यंत चांगली स्थितीत आहे.